SNJB (Jain Gurukul’s), K.K.H. Abad Arts, S.M.G. Lodha Commerce & S.P.H. Jain Science College, Neminagar, Chandwad-423101, Dist.-Nashik, Maharashtra.
Department of Electronic Science Organizes State Level One Day Webinar on "PCB Design – Schematic and Fabrication". 12th April, 2024, Time: 11:15 am to 02:15 pm.
मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत सेल्फी विथ माटी या विश्वविक्रमी मोहिमेत लक्षणीय योगदान दिल्याबद्दल चांदवडच्या नेमिनाथ जैन संस्थेचा पुणे विद्यापीठातर्फे दिलेला कृतज्ञता सत्कार माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि प्र -कुलगुरू डॉ.पराग काळकर व कुलसचिव डॉ.विजय खरे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य श्री महावीर पारख, प्रोफेसर तुषार चांदवडकर व आकाश महावीर पारख यांनी स्वीकारला.
स्वररंग 2023 - जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव कार्यशाळा - दिनांक: 20 सप्टेंबर 2023.
प्रिन्सिपल डॉ. डी. एन. शिंपी सर, डॉ. मनोज पाटील सर, डॉ. चांगदेव कुदनर सर, विद्यार्थी विकास मंडळ समन्वयक डॉ. देवेंद्र दगडे सर आणि सांस्कृतिक समन्वयक डॉ. दीपक रामचंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या जिल्हास्तरीय युवक महोत्सवांमध्ये समाविष्ट असलेले 29 कलाप्रकार, त्याबद्दलची माहिती व नियमावली इत्यादींची सविस्तर माहिती डॉ. दीपक रा. पाटील यांनी दिली. कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद या कार्यशाळेस लाभला.
चांदवड येथील आबड लोढा व जैन वरिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व प्लेसमेंट सेल तर्फे भारतातील नामांकित व अग्रगण्य आय.सी.आय. सी .आय बँकेत Relationship Manager या पदावर नियुक्तीसाठी प्रशिक्षण पार पडले. सदर प्रशिक्षणासाठी आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी मा. प्रतिक जाधव , मा. प्रतिक कळवणकर मा. सुरज नंबियार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.सुरेश पाटील सर होते . विद्यार्थ्यांनी नौकरी करण्यासाठी घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.सुरेश पाटील सर यांनी केले. मा. प्रतिक जाधव यांनी सदर पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा ,कामकाजाचे ठिकाण ,कामकाजाचे स्वरूप इतर माहिती दिली. तदनंतर लेखीपरीक्षा व गटचर्चा घेण्यात आली. या प्रशिक्षणात ९२ विद्यार्थी सहभागी झाले. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यापैकी काही निवडक विद्यार्थ्यांना येत्या चार दिवसात online पद्धतीने मुलाखत घेण्यात येणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी लवकरच आय.सी,आय.सी.आय.बँकेतर्फे महाविद्यालय व संबधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. आर.जे.इंगोले यांनी आजच्या तरुणानी बँकेचा जवळून अभ्यास केल्याशिवाय स्वंय-रोजगारापासून ते सामाजिक, आर्थिक, ओद्योगिक क्षेत्रात बदल घडून येऊ शकणार नाही असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अलका नागरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रविण बाचकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विजया जाधव ,प्रा.अलका नागरे ,प्रा.प्रविण बाचकर प श्री मुरली शिंदे यांनी परिश्रम घेतात.