चांदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या हर्बेरियमला आंतरराष्ट्रीय मान्यता
श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचार्यश्रम संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील हर्बेरियमला (शुष्क वनस्पतींचा साठा) न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डन कडून आंतरराष्ट्रीय मान्यता बहाल करण्यात आलेली आहे. या हर्बेरियमचा समावेश हर्बेरिओरम या आंतरराष्ट्रीय सूचित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या हर्बेरियमला न्यूयॉर्क बॉटनिकल गार्डन कडून 'SNJB' हा कोड देण्यात आलेला आहे. जगातील वनस्पतींचे इंडेक्स हर्बेरिओरम मध्ये दस्तऐवजीकरण करण्यात येते जे सतत वनस्पति विविधतेची निश्चित नोंद देतात. शुष्क वनस्पतींच्या नमुन्यांचा जतन केलेला हा संग्रह भविष्यातील दीर्घकालीन वैज्ञानिक अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. वनस्पती शास्त्र विभागाच्या या हर्बेरियममध्ये 800 पेक्षा जास्त फुलांच्या शुष्क वनस्पतींचे नमुने गोळा करून ठेवण्यात आलेले आहेत. जीवशास्त्र तसेच औषधनिर्माण शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना वनस्पतींचे ओळख प्रमाणीकरण प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आता संस्थेला प्राप्त झालेले आहेत. या हर्बेरियमचे व्यवस्थापक म्हणून डॉ. स्वप्निल वाघ यांची नोंद करण्यात आलेली आहे तर उपप्राचार्य डॉ. मनोज पाटील, विभाग प्रमुख डॉ. मयूर पाटील व डॉ. सुदिन दळवे यांचे त्यांना सहकार्य लाभणार आहे. या उपलब्धीसाठी एस.एन.जे.बी. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष श्री. दिनेशभाऊ लोढा, मानद सचिव श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे मानद सचिव श्री. झुंबरलाल भंडारी, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री. अजितभाऊ सुराणा, उपाध्यक्ष श्री. अरविंदभाऊ भनसाळी तसेच महाविद्यालय विकास समितीचे समन्वयक कांतीलालजी बाफना, सी. ए. महावीरभाऊ पारख व सी. ए. अक्षयजी भंडारी, श्री. पी. पी. गाळणकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शिंपी, माजी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन, उपप्राचार्य डॉ. चांगदेव कुदनर, आय.क्यू.ए.सी समन्वयक डॉ. ए. ए. वकील, कार्यालयीन अधीक्षक श्री. संदेश बुरड सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.