शैक्षणिक वर्ष 2023 -24 माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आपण दिनांक 11 फेब्रुवारी 2024 दुपारी दहा वाजता आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नवनियुक्त सदस्य रवींद्र भाऊ आबड उपस्थित होते भाऊ सांगायला आनंद होत आहे की 400 माझी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते मेळाव्याच्या मनोगतामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले या संस्थेमुळे ते आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत हे केवळ या एसएन जे बी इन्स्टिट्यूटमुळे आहे असं त्यांनी मनोगतात म्हटले. डेप्युटी कलेक्टर लता बागुल, ते विविध पदावर कार्यरत असणारे अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. एक माजी विद्यार्थी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी शेवाळे साहेब यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एमपीएससी करण्यासाठी 10 लाखाची पुस्तक देत असल्याचे देखील जाहीर केले. असे तीन-चार माजी विद्यार्थ्यांनी आम्ही देखील मदत करायला तयार आहोत असे आश्वासित केले. सर्व माजी विद्यार्थ्यांना चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यामध्ये विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.बेबी लालजी संचेती,उपाध्यक्ष श्री दिनेश भाऊ लोढा,मानद सचिव श्री जवाहरलालजी आबड,प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री अजित भाऊ सुराणा, उपाध्यक्ष श्री अरविंदभाऊ भनसाळी तसेच महाविद्यालय विकास समितीचे समन्वयक कांतीलालजी बाफना व सी. ए. महावीर भाऊ पारख या कार्यक्रमाची नियोजन केले गेले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दत्ता शिंपी उपप्राचार्य डॉ. चांगदेव कुदनर व उपप्राचार्य डॉ. देवेंद्र दगडे ,माजी विद्यार्थी मेळावा समन्वयक नितीन जैन, माजी विद्यार्थी मेळावा सदस्य सुरेश पाटील डॉ. तुषार चांदवडकर माजी विद्यार्थी मेळावा सचिव प्रा.राहुल अहिरराव याशिवाय कार्यालयीन अधीक्षक संदेश बुरड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेइतर कर्मचाऱ्यांनी मनापासून कष्ट घेतले त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
प्राचार्य, डॉ. दत्ता शिंपी.
मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत सेल्फी विथ माटी या विश्वविक्रमी मोहिमेत लक्षणीय योगदान दिल्याबद्दल चांदवडच्या नेमिनाथ जैन संस्थेचा पुणे विद्यापीठातर्फे दिलेला कृतज्ञता सत्कार माननीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि प्र -कुलगुरू डॉ.पराग काळकर व कुलसचिव डॉ.विजय खरे यांच्या उपस्थितीत स्वीकारताना संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य श्री महावीर पारख, प्रोफेसर तुषार चांदवडकर व आकाश महावीर पारख.
"स्वररंग – 2023" युवक महोत्सवामध्ये चांदवड महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश
चांदवड: येथील एस. एन. जे. बी. संचलित आबड, लोढा व जैन महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या “स्वररंग 2023” विभागीय युवक महोत्सव या कला स्पर्धेमध्ये लोकनृत्य व मूकनाट्य या दोन कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळालेली आहेत. नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयात संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील विविध संस्थांमधील जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी 29 कलाप्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. चांदवड महाविद्यालयाला विभागीय युवक महोत्सवामध्ये प्रथमच “प्रथम क्रमांकाची दोन पारितोषिके” मिळालेली आहेत.
हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. दीपक पाटील, महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. देवेंद्र दगडे, प्रतीक्षा जाधव मॅडम, दिव्या गडाख मॅडम, प्रियंका जाधव व उसवाड गावचे सरपंच संजय पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, संस्थेचे उपाध्यक्ष दिनेशजी लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंदजी भन्साळी, मानद सचिव जवाहरलालजी आबड, महाविद्यालयाचे समन्वयक कांतीलालजी बाफना, सी.ए. महावीरजी पारख तसेच प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी व उपप्राचार्य डॉ. मनोज पाटील, डॉ. चांगदेव कुदनर, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.