आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळामार्फत घेण्यात येणारा शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ चा जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालय चांदवड या महाविद्यालयात शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष २०२५ साजरा होणार आहे या जल्लोष २०२५ मध्ये भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय तालवाद्य वादन, भारतीय स्वर वाद्य वादन, भारतीय समूह गायन, लोकवाद्य वृंद, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, एकांकिका, प्रहसन, इत्यादी एकूण २७ कला प्रकार या जल्लोष महोत्सवात सादर होणार आहेत. महाविद्यालयाचा संघ हा एकूण ५५ व्यक्तींचा असणार आहे. या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा (बागलाण ) आणि येवला या तालुक्यातील महाविद्यालयातील अंदाजे 1200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत . या महोत्सवात प्राथमिक नोंद करण्याची १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी दिली. या महोत्सवात सांस्कृतिक समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, संघ व्यवस्थापक सह इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी केले.