"स्वररंग – 2023" युवक महोत्सवामध्ये चांदवड महाविद्यालयाचे नेत्रदीपक यश
चांदवड: येथील एस. एन. जे. बी. संचलित आबड, लोढा व जैन महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या “स्वररंग 2023” विभागीय युवक महोत्सव या कला स्पर्धेमध्ये लोकनृत्य व मूकनाट्य या दोन कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिके मिळालेली आहेत. नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयात संपन्न झालेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यातील विविध संस्थांमधील जवळपास 2000 विद्यार्थ्यांनी 29 कलाप्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. चांदवड महाविद्यालयाला विभागीय युवक महोत्सवामध्ये प्रथमच “प्रथम क्रमांकाची दोन पारितोषिके” मिळालेली आहेत.
हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. दीपक पाटील, महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. देवेंद्र दगडे, प्रतीक्षा जाधव मॅडम, दिव्या गडाख मॅडम, प्रियंका जाधव व उसवाड गावचे सरपंच संजय पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बेबीलालजी संचेती, संस्थेचे उपाध्यक्ष दिनेशजी लोढा, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंदजी भन्साळी, मानद सचिव जवाहरलालजी आबड, महाविद्यालयाचे समन्वयक कांतीलालजी बाफना, सी.ए. महावीरजी पारख तसेच प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी व उपप्राचार्य डॉ. मनोज पाटील, डॉ. चांगदेव कुदनर, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.