logo
  • DST-FIST Sponsored College (2018-19)
  • UGC-NSQF Courses (B. Voc. & C.C.)
  • Best College Award – 2015-16 of Savitribai Phule Pune University, Pune
  • NAAC Reacredited B++ Grade with CGPA 2.95 (3rd cycle 2020)

रानभाज्या व भरड धान्य महोत्सवाची दशकपूर्ती

चांदवड : श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेचे कर्मवीर के. ह. आबड कला, श्रीमान मो. गि. लोढा वाणिज्य व श्रीमान पी. एच. जैन विज्ञान महाविद्यालय, नेमिनगर, चांदवड येथे वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘रानभाज्या व भरड धान्य महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे यंदाचे हे दहावे वर्ष होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र मलोसे, विश्वस्त कांतीलालजी बाफणा व प्रशासकीय अधिकारी डॉ गोटन जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश संचेती, प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महोत्सवात महाविद्यालयातील ८३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी परिसरातील डोंगराळ भागातून विविध प्रकारच्या वन्य भाज्यांचे संकलन करून त्यांची ओळख, खाद्यउपयोग व पारंपरिक महत्त्व सादर केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या वन्य भाज्यांपासून एकूण १०९ विविध पाककृती तयार करून त्यांचे प्रदर्शन केले.
या पाककृतींमध्ये सूप, विविध प्रकारच्या भाज्या, थालीपीठ, ज्यूस, चटणी, डोसा, इडली यांसह अनेक पारंपरिक तसेच नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांचा समावेश होता. वन्य भाज्यांचा आहारातील उपयोग, त्यांचे पौष्टिक महत्त्व तसेच स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
मिलेट्सचा दैनंदिन आहारातील समावेश, त्यांचे पोषणमूल्य आणि पारंपरिक खाद्यपद्धतींचे जतन याबाबतही महोत्सवातून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक वनस्पतींची ओळख, वन्य खाद्य वनस्पतींचे संकलन, त्यांचा खाद्यपदार्थांमध्ये वापर आणि पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ सुदिन दळवे, डॉ मनोज पाटील, डॉ स्वप्नील वाघ, डॉ मयुर पाटील, सुषमा पुरकर, कांचन वडनेरे , स्वाती शेळके, शितल नांगरे, शरद बर्डे व विद्यार्थ्यांनी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा. बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष दिनेशभाऊ लोढा, प्रबंध समिती अध्यक्ष मा. अजितभाऊ सुराणा, उपाध्यक्ष अरविंदभाऊ भंन्साळी, महाविद्यालयाचे समन्वयक श्री. कांतीलालजी बाफणा, श्री. महावीरभाऊ पारख, श्री. पिंटुभाऊ संचेती व श्री. अक्षयजी भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.

View More


College Fee Structure 2026-2027


योग दिन - २१ जून २०२६

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, 🧘🌿

आपली श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम (SNJB) संस्था गौरवशाली शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय योग दिन (२१ जून २०२६) उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारी जीवनशैली आहे. या विशेष कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची आणि त्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी आपण सर्वांनी अवश्य घ्यावी.

https://forms.gle/GT2JXUNKXEfCrHoX7

👉 कृपया वरील लिंकवर क्लिक करून आपले नोंदणी (Registration) त्वरित पूर्ण करा. नोंदणी केलेल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र (Certificate) प्रदान करण्यात येईल. हे प्रमाणपत्र भविष्यात आपल्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी उपयुक्त ठरेल.

म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, तसेच हा नोंदणी फॉर्म आपल्या वर्गातील व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

चला, निरोगी शरीर, शांत मन आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी योगाचा संदेश सर्वदूर पोहोचवूया !

📅 दिनांक: २१ जून २०२६
🕖 वेळ: सकाळी ७:०० वाजता
📍 स्थळ: महाविद्यालय परिसर

योगः कर्मसु कौशलम्
— योग म्हणजे जीवन जगण्याची कला.

🙏 आपल्या सहभागाची अपेक्षा! 🙏

View More


शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू. लक्षात ठेवा... चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू.
लक्षात ठेवा... चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण!

View More


BCA Final Merit List


BBA Final Merit List


BCA Provisional Merit List


BBA Provisional Merit list


First Year B.B.A. and B.C.A. Admission Notification 2025-26

First Year B.B.A. and B.C.A. Admission Notification 2025-26

Merit form for institute level BBA BCA admission 2025-26

https://forms.gle/TuvFrPsUTzvSf4339

View More


जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन

आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळामार्फत घेण्यात येणारा शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ चा जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालय चांदवड या महाविद्यालयात शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष २०२५ साजरा होणार आहे या जल्लोष २०२५ मध्ये भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय तालवाद्य वादन, भारतीय स्वर वाद्य वादन, भारतीय समूह गायन, लोकवाद्य वृंद, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, एकांकिका, प्रहसन, इत्यादी एकूण २७ कला प्रकार या जल्लोष महोत्सवात सादर होणार आहेत. महाविद्यालयाचा संघ हा एकूण ५५ व्यक्तींचा असणार आहे. या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा (बागलाण ) आणि येवला या तालुक्यातील महाविद्यालयातील अंदाजे 1200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत . या महोत्सवात प्राथमिक नोंद करण्याची १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी दिली. या महोत्सवात सांस्कृतिक समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, संघ व्यवस्थापक सह इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी केले.


Displaying 1 to 10 of 19
rec./pg.

© acschandwadcollege.com All rights reserved.